आवळा लोणचे | Awla Pickle | Amla Pickle | Gooseberry Pickle

साहित्य : १) १५ आवळे  २) २ मोठे चमचे मीठ  ३) २ मोठे चमचे तयार आंबा पिकल मसाला  ४) २ चमचे लाल मिरची पावडर  ५ )तेल  दीड वाटी...




साहित्य :
१) १५ आवळे 
२) २ मोठे चमचे मीठ 
३) २ मोठे चमचे तयार आंबा पिकल मसाला 
४) २ चमचे लाल मिरची पावडर 
५ )तेल  दीड वाटी 
६ ) पाव वाटी मोहरी 
७ )पाव वाटी जिरे 
८ )पाव वाटी धने 
९ )२०-२५ मेथीचे दाणे 


कृती :
१) आवळे स्वच्छ धुवून ,पुसून कोरडे करून घ्यावेत .
२) आवळ्याचे काप करून घ्यावे .
३) कढई मध्ये  मोहरी ,जिरे ,धने गरम करून घ्यावे .जिरे भाजल्याचा वास यायला लागला कि गस बंद करावा आणि मेथीपण गरम करून घ्यावी .
४)वरील हे मिश्रण थंड करून मिक्सरवरून भरड काढावी .लोणच्याचा हा मसाला तयार करून घ्यावा 
५)त्यानंतर कढई मध्ये दीड वाटी तेल घालून गरम करावे .त्यानंतर चिरलेल्या आवळ्याचे काप तेलात परतावे .
आवळा बर्यापैकी शिजेपर्यंत परतावा.
६)गस बंद करावा .त्यामध्ये लाल मिरची पावडर ,तयार आंबा पिकल मसाला ,मीठ  घालावे .चांगल मिक्स करावे .
७ )त्यानंतर त्यामध्ये वरील तयार केलेला लोणच्याचा मसाला आवळ्याच्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करावे .
८) आपले आवळ्याचे लोणचे तयार झाले .


Related

Pickle 2756709098934044424

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item