Ratalyache Cutlet - रताळ्याचे कटलेट

साहित्य : ५०० ग्रॅम रताळी  आलं - मिरचीचे वाटण  गरजेपुरते साबुदाण्याचे पीठ  १ चमचा लिंबाचा रस  मीठ, गरजेनुसार  थोडी उपवासाची भ...



साहित्य :
  • ५०० ग्रॅम रताळी 
  • आलं - मिरचीचे वाटण 
  • गरजेपुरते साबुदाण्याचे पीठ 
  • १ चमचा लिंबाचा रस 
  • मीठ, गरजेनुसार 
  • थोडी उपवासाची भाजणी 
  • तेल किंवा तूप 
  • जिरेपूड 
कृती :

१. रताळी स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावीत आणि साले काढून किसावीत. 
२. त्यामध्ये आलं - मिरचीचे वाटण, मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस आणि गरजेनुसार साबुदाण्याचे पीठ घालून चांगले एकत्र करावे. 
३. नंतर वरील मिश्रणाचे छोटे - छोटे चपटे गोळे करावे. 
४. वरील गोळे उपवासाच्या भाजणीत घोळून तळावे किंवा shallow fry करावे. 
५. रताळ्याचे कटलेट खायला देताना सोबत खजुराची चटणी द्यावी . 

Related

upwas Recipe 722997311310488275

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item