रव्याचे आप्पे / Instant Aappe Recipes

Instant Rava Appam Recipe in English Instant Aappe Recipes in English   वेळ: मिश्रण भिजवायला १ तास + आप्पे बनवायला ३० मिनीटे साधारण १५ ते ...

Instant Rava Appam Recipe in English
Instant Aappe Recipes in English 

वेळ: मिश्रण भिजवायला १ तास + आप्पे बनवायला ३० मिनीटे
साधारण १५ ते १८ आप्पे

साहित्य:
३/४ कप जाड रवा
३/४ ते १ कप आंबट ताक
१/२ टिस्पून जिरे पावडर
३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५-६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१/२ टिस्पून आले खिसून
२ चिमटी खायचा सोडा
१/४ कप तेल


कृती:
१) रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आले, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
२) आप्पेपात्र गॅसवर गरम करत ठेवावे. 
३) मिश्रणात २ चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे. अप्पेपात्रातील गोलांना तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे. वरून झाकण ठेवून मिडीयम गॅसवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी. 
चाकूने किवां काट्या चमच्याने पलटून दुसरी बाजू थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी.
४)नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे. आप्पे थंड चांगले लागत नाही.

Related

South Indian 2018741834497154898

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item