गोडा मसाला गोडा मसाल्याची पाककृती - [Goda Masala Recipe] तीळ, खोबरे, खसखस सारखे पदार्थ वापरून बनविलेला गोडा मसाला चवीला काहीसा गोडसरच असत...

गोडा मसाला

गोडा मसाल्याची पाककृती - [Goda Masala Recipe] तीळ, खोबरे, खसखस सारखे पदार्थ वापरून बनविलेला गोडा मसाला चवीला काहीसा गोडसरच असतो. मटकीची उसळ, कटाची आमटी, मिसळ पाव, आमटी डाळ, भरली भेंडी, तोंडलीची भाजी सारख्या व्यंजनामध्ये गोडा मसाला आवर्जून वापरला जातो.

१/२ किलो धणे
१/४ किलो सुकं खोबरं
१/४ किलो तीळ
५० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम हळकुंड
२० ग्रॅम लवंग
२० ग्रॅम दालचीनी
२० ग्रॅम काळे मिरे
२० ग्रॅम तमाल पत्र
२० ग्रॅम मसाला वेलदोडे
२० ग्रॅम दगड फुल
२० ग्रॅम खडा हिंग
१० ग्रॅम जायपत्री
१० ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
१०० ग्रॅम जीरे

प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
खोबर्‍याचे तुकडे करून किसून भाजून घ्या.
तीळ कोरडेच भाजून घ्या.
बाकीच सर्व पदार्थ थोडया तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा व चाळून घ्या.
तयार गोडा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरा.

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item