कैरीची डाळ /आंब्याची डाळ /Aambyachi daal
Aambyachi daal in English साहित्य : १ वाटी हरबरा डाळ 2 कैरी २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात) बारीक चिरलेली कोथ...
https://sheplansdinnermarathi.blogspot.com/2018/04/aambyachi-daal.html
Aambyachi daal in English
साहित्य :
- १ वाटी हरबरा डाळ
- 2 कैरी
- २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात)
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ चविप्रमाणे
- १ टीस्पून साखर
फोडणीचे साहित्य -
हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता,लाल सुकी मिरची
कृती :
१) हरबरा डाळ थंड पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी.
२) कैरीची साल काढुन त्याचे तुकडे करावेत किंवा सरळ कैरी खिसुन घ्यावी.
३) हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत,
४) खिसलेली कैरी, डाळ, मीठ, मिरची,मीठ साखर ,कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरमधे जाडसर वाटुन घ्यावे.
५)तेलाची हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता,सुक्या मिरच्या घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.