Alu Chi Bhaji - Aluche Fatfat - colocasia leaves gravy recipe
Aluchi Bhaji Recipe in English साहित्य : 5 अळूची पाने 2 टेस्पून शेंगदाणे 1 टेस्पून चणा डाळ ६-७ मेथी दाणे १-२ चमचे खि...

Aluchi Bhaji Recipe in English
साहित्य :
- 5 अळूची पाने
- 2 टेस्पून शेंगदाणे
- 1 टेस्पून चणा डाळ
- ६-७ मेथी दाणे
- १-२ चमचे खिसलेले सुक खोबर
- ३ टेस्पून बेसन
- १ टीस्पून चिंचेचा कोळ
- १ टीस्पून लाल तिखट
- २ टीस्पून गरम मसाला
- २ टीस्पून गूळ
- चवीपुरते मीठ
- २ चमचे तेल
- २ टेस्पून तेल,
- १/२ टेस्पून मोहरी,
- १/२ टेस्पून जिरे ,
- चिमुटभर हिंग,
- १/४ टीस्पून हळद,
कृती:
- शेंगदाणे आणि चणा डाळ ३० मिनिट गरम पाण्यात पाण्यात भिजत घालावी.
- अळूची पाने धुवून पुसून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत.अळूची पाने त्याच्या देठासहित चिरून घ्यावी
- एका कढई मध्ये २ चमचे तेल घालावे ,त्यात मेथीचे दाणे घालावे ,सुक खिसलेले खोबरे घालावे .आणि आळूची पाने आणि चिरलेली देठ घालावे आणि चांगले आळूच्या पानांचा रंग बदलेपर्यंत तेलात परतून घ्यावे .(असे परतल्याने आळू घश्याला खाजत नाही )
- नंतर १ ग्लास पाणी घालावे आणि २-३ मिनिट आळू शिजवावा .
- आता चना डाळ ,शेंगदाणे ,लाल तिखट ,गरम मसाला ,गुळ ,चिंचेचा कोळ ,मीठ घालावे
- सगळ मिश्रण हलवून घ्यावे आणि ६-७ मिनिट चांगल शिजवावे .
- एकदा आळूची पाने आणि देठ चांगली शिजली कि मिश्रण चांगले घोटून घ्यावे आणि हवे असेल तर थोड पाणी घालावे आणि गुठळ्या न होता बेसन पीठ मिक्स करावे .आणि ३-४ मिनिट चांगले फट फट आवाज येई पर्यंत उखळावे .
- तोपर्यंत दुसर्या फोडणीच्या कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी ,जिरे,हिंग हळद घालावे
- हि फोडणी आळूंच्या भाजीवर ओतावी .
- हि भाजी चपाती ,भाकरी सोबत सर्व्ह करावी .