मामलेदार मिसळ ठाणे

ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा : मामलेदार ची प्रसिध्द मिसळ साहित्य - कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ , बटाटे ४/५, लसुण १ मोठा गड्डा, १ बोटभर आल...

ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा : मामलेदार ची प्रसिध्द मिसळ

साहित्य -
कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ , बटाटे ४/५, लसुण १ मोठा गड्डा, १ बोटभर आल्याचा तुकडा, तेल १.५ वाट्या, तिखट १.५ वाटी, गरम मसाला ४ चमचे, १०० ग्राम पापडी, २५०ग्राम हिरवे वाटाणे, ५०० ग्राम फरसाण चवीनुसार मीठ.

कृती -
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.

पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.

एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.

उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.

वरुन घालायसाठी कांदे बारीक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.

खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.

"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.

विशेष सूचना

१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो ,पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.नंतर ताक प्यावे.

अतिशय महत्त्वाचे:

२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.

३. मामलेदार मिसळ ची इन्फॉर्मशन आणि फोटो मी गुगल वरून घेतले आहेत.

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item