लसणीचे तिखट I Garlic Chutney
साहित्य : १ वाटी लसणीचे काप १/४ वाटी शेंगदाणे २/३ वाटी भाजून सुके खोबरे १ चमचा मिठ १/४ कप लाल तिखट कृती : १) प्रथम शेंगदाणे चांगले भ...

१ वाटी लसणीचे काप
१/४ वाटी शेंगदाणे
२/३ वाटी भाजून सुके खोबरे
१ चमचा मिठ
१/४ कप लाल तिखट
कृती:
१) प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत त्याची साले काढून घ्यावीत. त्याचा कूट करून घ्यावा.
२) सुके खोबरे किसून घ्यावे. चांगले खमंग भाजून घ्यावे. यातील २/३ वाटी भाजलेला किस घ्यावा.
३) मिक्सरमध्ये लसणीचे काप आणि मिठ वाटून घ्यावे. लसणीची बारीक पेस्ट करून घेतली कि चांगले,
४) आता शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, लसणीची तयार केलेली पेस्ट, लाल तिखट आणि गरज वाटल्यास मिठ असे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक होईस्तोवर वाटावे.
हे लसणीचे तिखट तोंडीलावणी म्हणून मस्त लागते.