पालक पराठे स्टफड विथ पोट्याटो / Palak Paratha with stuffed with Potato

साहित्य : १) १ पालक जुडी २) 5-6 हिरव्या मिरच्या ३) १ चमचा धने पावडर ४) १ चमचा जीरा पावडर 5) २ चमचा लाल मिरची पावडर ...









साहित्य :

१) १ पालक जुडी
२) 5-6 हिरव्या मिरच्या
३) १ चमचा धने पावडर
४) १ चमचा जीरा पावडर
5) २ चमचा लाल मिरची पावडर
6) आलं -लसून पेस्ट २ चमचे
७) मैदा १ वाटी
७)गव्हाचं पीठ ३ वाटी
८) तेल छोटी वाटी
९) 5-6 medium साईझ बटाटे (potato )
10) चवीनुसार मीठ


कृती :

पालक पराठे पीठ तयार करण्यासाठी :

१)पालक स्वच्छ धुवून ,गरम पाण्यात उखळून घ्यावा .


२)उखळून घेतलेला पालक थंड झाला कि मिक्सर वरून बारीक करून घ्यावा



३) १ वाटी  मैदा ,३ वाट्या गव्हाचे पीठ  एकत्र करावे


त्यामध्ये  १ चमचा लाल मिरची पावडर ,१ चमचा मिरची पावडर ,चवीनुसार मीठ ,धना पावडर ,जीरा पावडर,आलं लसून पेस्ट २ चमचे  घालावे .




४) त्यांतर मिक्सर वरून काढलेली पालकची पेस्ट घालून पीठ घट्ट मळावे .




Stuffing साठी   पोट्याटो (Potato) सारण  :

१) बटाटे स्वच्छ धुवून शिजण्यासाठी कुकरला लावावेत (साधारण ४ शिट्या केल्या कि बटाटे छान शिजतात )

२) बटाटे शिजल्यावर कुकर थंड झालं कि बटाट्याचे वरचे साल काढावे .

३) मिक्सर वरून मिरची वाटून घ्यावी .
४)बटाटे एका बाऊल मध्ये कुसकरून घ्यावा .त्यामध्ये  १ चमचा वाटून घेतलेली मिरची ,चवीनुसार मीठ ,१ चमचा आला मिरची पावडर  घालाची

5) मस्त मिश्रण एकत्र करून चांगल मळून घ्यावे .

6) हे आपले stuffing साठी मिश्रण तयार झाले .


पराठ्याची कृती :

१) पालकचे घट्ट मळलेल्या पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यावा
आणि छोटा पराठा लाठावा

२)त्यानंतर बटाट्याच्या सारणाचा छोटासा गोळा करून घ्यावा .

आणि तो छोट्या लाटलेल्या पराठ्यामध्ये ठेवून चारी बाजूनी बंद करून उंडा बनवावा .


३) आणि आता अलवार पराठा लाठावा .


गॅस  वर तवा ठेवून पराठा दोन्हा बाजूनी भाजावा .



आपला पालक पराठे स्टफड विथ पोट्याटो तयार झाला आहे ..पराठ्यावर तूप किवा butter घालून टोमाटो सॉस सोबत सर्व्ह  करावे .



Related

Tikhat 3810446363749396322

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item