अळूची पातळ भाजी \ Colocasia leaves sabji

Aloo Cha Fatfata in English अळूची पातळ भाजी | अळूचं फतफतं | Aluchi Patal Bhaji | Aluche Fatfat  | Colocasia leaves sabji साहित...


Aloo Cha Fatfata in English

अळूची पातळ भाजी | अळूचं फतफतं | Aluchi Patal Bhaji | Aluche Fatfat | Colocasia leaves sabji



साहित्य:

१२ अळूची मध्यम पाने
४ टेस्पून शेंगदाणे
२ ते ३ टेस्पून तूर डाळ

१/४ टीस्पून लाल तिखट
३ टेस्पून बेसन , 
2 टीस्पून चिंच ,
२-३  चमचे गुळ 
७-८ दाणे मेथी ,
5-6 चमचे किसलेलं सुख खोबर   
2 टेस्पून तेल

फोडणीसाठी :
2 टेस्पून तेल,
२ चिमटी मोहोरी,
१/८ टीस्पून हिंग,

 १/४ टीस्पून हळद, 


कृती:
1.अळूची पाने धुवून पुसून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. 

नंतर पानं बारीक चिरून घ्यावी.

२.शेंगदाणे आणि तूर डाळ किमान २ तास पाण्यात भिजत घालावी. 


३.कढईत २ चमचे तेल घ्याव.त्यात  खिसलेल खोबर शेंगदाणे आणि तूर डाळ टाकावी ,मेथीचे दाणे टाकावेत चांगले फ्राय करावे त्यानंतर आळूची चिरलेली पाने , देठं घालावीत टाकावी आणि पानाचा कलर बदलेपर्यंत चांगल परतावे म्हणजे आळू घश्याला खाजणार नाही.

४. त्यानंतर २ वाट्या पाणी घालावे ,मीठही घालावे ,लाल तिखट,चिचेचा कोळ ,गुळ घालावे आणि चांगले उखळावे आणि भाजी घोटून घ्यावी .

५.चिंचेचा कोळ घातल्यावर अजून ३-४ मिनिटे शिजू द्यावे.


६.१/२ टेस्पून बेसन गुठळी न होता मिक्स करून घ्यावे.हे मिश्रण कढईत घालून ढवळावे. 

७.गरजेनुसार लागले तर थोडे पाणी घालावे. गोडा मसाला, गूळ, आणि लागल्यास मीठ घालून मिक्स करावे. 

८ . त्यानंतर दुसर्या छोट्या कढल्यात  तेलात मोहरी हळद ,हिंग घालून फोडणी करावी
आणि आळूच्या भाजीला तडका ध्यावा 

९.बेसन शिजेस्तोवर उकळी काढावी. भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप :
आळू हा खाजरा असतो तर आळूची पाने चिरताना हाताला थोडसं तेल लाऊन चिरावे .




Related

Veg Sabji 7748777483409509484

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item