पडवळाची भजी

साहित्य: पाव किलो पडवळ (कोवळा) ३/४ कप बेसन ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून १/४ टिस्पून हळद १/४ चमचा हिंग दीड टिस्पून लाल तिखट १/२ टि...

साहित्य:
पाव किलो पडवळ (कोवळा)
३/४ कप बेसन
३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/४ टिस्पून हळद
१/४ चमचा हिंग
दीड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून ओवा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बेसनात हळद, हिंग आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. त्यात ओवा, कोथिंबीर आणि मिठही घालावे. पिठाची चव पाहून गरजेनुसार मिठ किंवा तिखट घालावे.
२) पडवळाच्या आतील बिया आणि भुसभुशीत भाग चमच्याच्या मागील बाजूने कोरून काढावा. पडवळाच्या पातळ चकत्या कराव्यात.
३) पडवळाच्या चकत्या अर्धवट वाफवून घ्याव्यात. (मी मायक्रोवेव्हमध्ये, पाण्याचा हबका मारून दीड मिनिट झाकण ठेवून वाफवल्या. वाफवून झाल्यावर झाकण लगेच काढावे.)
४) तेल गरम करावे व नंतर मध्यम आचेवर ठेवावे. वाफवलेल्या चकत्या पिठात घालून तेलात सोडाव्यात. सोनेरी रंगावर भजी तळाव्यात.

Related

Snacks 1870020348945856442

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item