रव्याचे आप्पे / Instant Aappe Recipes
Instant Rava Appam Recipe in English Instant Aappe Recipes in English वेळ: मिश्रण भिजवायला १ तास + आप्पे बनवायला ३० मिनीटे साधारण १५ ते ...

Instant Aappe Recipes in English
वेळ: मिश्रण भिजवायला १ तास + आप्पे बनवायला ३० मिनीटे
साधारण १५ ते १८ आप्पे
साहित्य:
३/४ कप जाड रवा
३/४ ते १ कप आंबट ताक
१/२ टिस्पून जिरे पावडर
३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५-६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१/२ टिस्पून आले खिसून
२ चिमटी खायचा सोडा
१/४ कप तेल
कृती:
१) रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आले, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
२) आप्पेपात्र गॅसवर गरम करत ठेवावे.
३) मिश्रणात २ चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे. अप्पेपात्रातील गोलांना तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे. वरून झाकण ठेवून मिडीयम गॅसवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी.
चाकूने किवां काट्या चमच्याने पलटून दुसरी बाजू थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी.
४)नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे. आप्पे थंड चांगले लागत नाही.