गुळपोळी - gulpoli / Sankrant Special Recipe

साहित्य: गुळ तयार करण्यासठी लागणार साहित्य : १/२ किलो गूळ   ३/४ कप तिळ १/४  कप शेंगदाणे १/२ कप खसखस १/२ कप तेल २ लहान चमचे तूप पो...


साहित्य:

गुळ तयार करण्यासठी लागणार साहित्य :
१/२ किलो गूळ
 ३/४ कप तिळ
१/४  कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
२ लहान चमचे तूप

पोळीसाठी साहित्य 

२ वाटया कणीक

१ वाटी मैदा
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ


१) कणीक, मैदा  एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवावे. 

२) साधा गुळ घ्यावा .सर्वप्रथम गुळ किसून घ्यावा. 
३)तीळ, खसखस भाजून घ्यावे व नंतर कुटून घ्यावे. 
४)अडीच चमचा डाळीचे पीठ थोडया तुपावर चांगले भाजून घ्यावे. 
५)तीळ कुट, शेंगदाण्याचे कुट ,खसखस ,बेसन (डाळीचे पीठ) वेलदोडयांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्यावे. 

६)नंतर कणकेच्या दोन लाटया जरा लाटून घ्याव्यात. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटावी. तव्यावर खमंग भाजावी. 

***
गुळाच्या पोळया गारच चांगल्या लागतात, म्हणून अगोदरच करून ठेवाव्यात. त्या थोडयाशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.

Related

Sweet 2838274131488106628

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipe Here

Subscribe Youtube Channel

Follow Us On Facebook

Popular

Recent

Blog Archive

Side Ads

Translate Website in your Languge

Connect Us

item