Chitranna | Lemon Rice | चित्रांन्न / Lemon Rice Recipe In Marathi
Chitranna | Lemon Rice in English Chitranna | Lemon Rice in Hindi साहित्य :- १) दीड वाटी बासुमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात २) प...
https://sheplansdinnermarathi.blogspot.com/2018/03/chitranna-lemon-rice-lemon-rice-recipe.html
Chitranna | Lemon Rice in English
Chitranna | Lemon Rice in Hindi
१) दीड वाटी बासुमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात
२) पाव वाटी शेंगदाणे
३) पाव वाटी पंढरपुरी डाळ
४) एक मोठा चमचा उडदाची डाळ
५) एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे
६)चवीनुसार मीठ
७) नऊ-दहा कढीलिंबाची पान
८) १ लिंबाचा रस
९) तेल आणि कोथिंबीर .
१०) मोहरी ,जिरे हिंग
११) १ चमचा हळद
१२) १ कांदा बारीक चिरून
१३) १ चमचे आलं -लसूण पेस्ट
कृती :
१) भात थोडस तेल घालून मोकळा शिजवून घ्यावा .
२)कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालावी .मोहरी तडतडल्यावर ,शेंगदाणे घालून चांगले परतून घ्यावे .
३) त्यानंतर डाळ ,उडीद डाळ ,जिरे आलं-लसूण पेस्ट ,घालून परतावे .त्यानंतर कडीपत्ता पाने ,कांदा ,हिरवी मिरची ,हिंग हळद घालून मिश्रण चांगले परतावे .
४)अर्धा लिंबू रस घालून पुन्हा चांगले मिश्रण परतावे.
५) त्यानंतर शिजलेला भात घालावा .आणि राहिलेला अर्धा लिंबू हि पिळावा .
६) सगळे मिश्रण हालवून भात चांगला परतून घ्यावा .
७) आपला चित्रांन भात /लेमन राईस तयार झाला आहे .
टिप्स :
१) हिरव्या मिरची ऐवजी सुकी लाल मिरची पण वापरू शकतो